Palkhi (Dindi) Procession at DEMS
DEMS’s Little Warkaris also conveyed their tribute to Lord Vitthal by carrying out a small procession (Palkhi) around the schools premises. On their way they enthusiastically chanted hymns and sang devotional songs.
Palkhi (Dindi) Procession is carried out to worship Lord Vitthal. Devotees of Vitthal visit Pandharpur to pay their tribute every year. These Devotees are called as Warkaris.
Students get dressed in Indian traditional outfits and preach the teachings of Lord Vitthal which teach us how to respect the elders and the love and care for our parents.
Founder Director S.M. Katkar Sir, Secretary Jayesh Katkar Sir, Executive Director Pradeep Khandave Sir, Principal of DEMS Renuka Datta Madam, Supervisors, Teaching and Non-Teaching Staff accompanied the procession with enthusiasm.
News in Marathi
बाल वारकऱ्यांनी केला विठूनामाचा गजर
आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त येथील ज्ञानगंगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्येही बाल वारकऱ्यांनी पालखी काढून विठ्ठलनामाचा गजर केला. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या एका वैभवशाली सांस्कृतिक परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना झाली.
संस्थेच्या पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी धोतर-कुडता गांधी टोपी अशा पारंपरिक पोशाखात हाती टाळ मृदुंग घेऊन या सोहळ्यात सहभागी झाले होते. काही विद्यार्थ्यांनी विठोबा-रखुमाई, तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मुक्ताबाईंचे वेश परिधान केले होते. एका आगळ्या चैतन्यमय वातावरणात पालखीचे प्रस्थान होताच चिमुकल्यांनी केलेल्या ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या घोषात सारा परिसर दुमदुमला.
प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी कीर्तन सादर केले. आपल्यावर सतत माया करणाऱ्या आई वडिलांबाबत आदराची वागणूक ठेवण्याचा संदेश यामधून देण्यात आला. संस्थेचे संस्थापक-संचालक एस. एम. काटकर, सचिव जयेश काटकर, कार्यकारी संचालक प्रदीप खांदवे, मुख्याध्यापिका रेणुका दत्ता, तसेच पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही बालचमूच्या या आनंदात न्हाऊन निघाले.