ज्ञानगंगा शाळेत मायमराठीचा जागर
[vc_row][vc_column][vc_column_text]हिंगणे येथील झील एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानगंगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त शाळेने विद्यार्थ्यांसमवेत मराठी भाषा प्रबोधन आणि ग्रंथदिंडी यांचे आयोजन केले होते.ही ग्रंथदिंडी शाळेपासून पु.ल.देशपांडे उद्यान (कलाग्राम )या ठिकाणी पायी काढण्यात आली.मराठी बद्दल अभिमान बाळगणाऱ्या घोषणा देत विद्यार्थ्यानी पथमार्गावरील वाटसरुंना मराठी दिनाच्या शुभेच्छा देत बॅच लावले.त्यानंतर ही दिंडी कलाग्राम मध्ये नेण्यात आली.त्यावेळी पु.ल. देशपांडे उद्यानात ज्ञानगंगा शाळेने मराठी दिनानिमित्त विविध कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमात बाल साहित्यिकांनी आपल्या प्रतिभेने व कल्पना शक्तीने [...]
