ज्ञानगंगा शाळेत मायमराठीचा जागर
हिंगणे येथील झील एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानगंगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त शाळेने विद्यार्थ्यांसमवेत मराठी भाषा प्रबोधन आणि ग्रंथदिंडी यांचे आयोजन केले होते.ही ग्रंथदिंडी शाळेपासून पु.ल.देशपांडे उद्यान (कलाग्राम )या ठिकाणी पायी काढण्यात आली.मराठी बद्दल अभिमान बाळगणाऱ्या घोषणा देत विद्यार्थ्यानी पथमार्गावरील वाटसरुंना मराठी दिनाच्या शुभेच्छा देत बॅच लावले.त्यानंतर ही दिंडी कलाग्राम मध्ये नेण्यात आली.त्यावेळी पु.ल. देशपांडे उद्यानात ज्ञानगंगा शाळेने मराठी दिनानिमित्त विविध कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमात बाल साहित्यिकांनी आपल्या प्रतिभेने व कल्पना शक्तीने साहित्यिकांचे विचार,भाषण, आपल्या अभिनयातून मांडून साहित्याचे प्रबोधन करण्याचा छान प्रयत्न केला.
डीएड महाविद्यालयाचे प्राचार्य श्री बबन जगताप सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुराधा निकम मॅडम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या, तसेच पर्यवेक्षिका यांच्यासह शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
कालाग्राम येथे कार्यक्रम करण्यासाठी नगरसेविका माननीय श्रीमती. ज्योतिताई गोसावी यांनी परवानगी मिळवून दिल्याबद्दल त्यांना अनेक धन्यवाद.
संस्थेचे संस्थापक श्री.एस.एम. काटकर सर, सचिव डॉ. श्री. जयेश काटकर सर, संचालक श्री.उद्धव शिद सर यांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे.
