Deep Pujan
मनामनांतील अज्ञानाचा अंध:कार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या दिव्यांचे पूजन करून हिंगण्यातील ज्ञानगंगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तेजाला वंदन करण्यात आले.
दीप पूजनाने मनातील विचार दूर होऊन ज्ञानाच्या तेजाने माणूस झळाळून निघतो. याच दीपांना नमन करण्यासाठी आषाढ आमावस्या, अर्थात दिव्याच्या आमावस्येनिमित्त (३१ जुलै) शाळेमध्ये दीपपूजनाच्या आगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पूजनाने शाळेच्या या ज्ञानमंदिरातील वातावरणात आणखी पावित्र्य निर्माण झाले आणि असेच तेजाने तळपत राहण्याचा संदेश विद्यार्थ्यांना मिळाला.
संस्थेचे संस्थापक संचालक एस. एम. काटकर, बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद सूर्यवंशी, डीएड महाविद्यालयाचे प्राचार्य बबन जगताप, शाळेच्या प्राचार्या रेणुका दत्ता, पर्यवेक्षिका नंदिता ब्रह्मा, तसेच पूर्व प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.