शिक्षकांच्या निबंध स्पर्धेत घवघवीत यश
म. ए. सो. बालशिक्षण मंदिर, डे, जि. पुणे या शाळेने दिनांक २२ /१०/२०२१ रोजी शताब्दी वर्षात पदार्पणाचे औचित्य साधून डिसेंबर मध्ये शिक्षकांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्ञानगंगा इंग्लिश मिडियम स्कूल शाळेतील १३ शिक्षकांनी सहभाग घेवून मोठा प्रतिसाद दिला. या स्पर्धे मध्ये १०० शाळांमधील १२३ शिक्षकांनी सहभाग घेतला होता. त्या पैकी २८ निबंध छाननी करून निवडले गेले. निवडक २८ निबंधामध्ये अंतिम निकालासाठी १० निबंध निवडले गेले. या १० निबंधांतून प्रथम तीन क्रमांक आणि उत्तेजनार्थ दोन असे एकूण पाच क्रमांक मा. परीक्षकांनी निवडले होते. त्या स्पर्धेत ज्ञानगंगा इंग्लिश मिडियम स्कूल, सिंहगड रोड, पुणे या शाळेतील सौ. शुभांगी दिनेश पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. सन्मान चिन्ह व रोख रक्कम पारितोषिक दिले जाणार आहे.
संपूर्ण श्रेय ज्ञानगंगा इंग्लिश मिडियम स्कूल चे संस्थापक मा. श्री. एस. एम काटकर , सेक्रेटरी श्री. जयेश काटकर,तसेच शाळेचा आ. प्राचार्या सौ. रेणुका दत्ता, पर्यवेक्षिका यांनी सहभागी शिक्षकांना निबंध स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिली, तसेच मार्गदर्शन केले. त्यामुळे हे संपूर्ण श्रेय शाळेचे आहे.