प्रसन्न जगताप यांची सदिच्छा भेट
झील एज्युकेशनच्या ज्ञानगंगा इंग्रजी माध्यम शाळा, हिंगणे येथील शाळेस माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मा. संभाजीराव काटकर, शाळेच्या प्राचार्या सौ. रेणुका दत्ता, पर्यवेक्षिका नीलिमा भिंगारदिवे, मुग्धा अभ्यंकर, नंदिता ब्रह्मा उपस्थित होत्या.
या प्रसंगी जगताप म्हणाले, “गेल्या १५ वर्षांपासून ही शाळा १००% निकाल देते, ही अभिमानाची बाब आहे. सिंहगड रोडपरिसरात ज्ञानगंगा इंग्रजी माध्यमशाळेचे शहारात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. नुर्सेर्य पासून दहावी पर्यंतच्या मुलांमध्ये कमालीची शिस्त पाहायला मिळाली असून स्वच्छता, पाण्याची, स्वच्छतागृहांची पुरेपूर सोय असल्याचे पाहून मनाला समाधान वाटले.
जगताप पुढे म्हणाले, “येथील शिक्षकवर्ग उच्चशिक्षित असून याच संपूर्ण फायदा विद्यार्थ्यांनी करून घ्यावा, जीवनात ध्येय असेल तर त्याची बीजारोपण प्रक्रिया अशा सुविधासंपन्नशाळेतूनच होते.”
प्राचार्या सौ. रेणुका दत्ता यांनी सदिच्छा भेटीबद्दल प्रसन्ना जग्तापांचे मनःपूर्वक आभार मानले