ज्ञानगंगा शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश
झील एज्युकेशन सोसायटीच्या सांगली येथील झील इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दि इन्सेप्शन’ या स्पर्धेत पुण्यातील हिंगणे येथील ज्ञानगंगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विविध स्पर्धांमध्ये ज्ञानगंगा शाळेतील विद्यार्थ्यांनी बाजी मारली.त्यामध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धेत कनिष्ठ गटात पहिली अ मधील अराध्य घाग ने दुसरा क्रमांक मिळविला, दुसरी ते चौथी या गटात तिसरी अ मधील शारीन आशिष दमके ने पहिला, तर तिसरी ब मधील स्वस्तिक भाविकुमार बडवे ने दुसरा क्रमांक मिळविला.चित्रकला स्पर्धेत दुसरी ते चौथी गटात चौथी अ मधील वैष्णवी मानकरने तिसरा क्रमांक मिळविला. पाचवी ते सातवी गटात सातवी अ मधील अथर्व घाटगे ने प्रथम क्रमांक, तर सहावी अ मधील योगेंद्र डोळसे याने तिसरा क्रमांक मिळविला.आठवी ते दहावी गटात दहावी अ मधील ओम निकुंभ याने पहिला क्रमांक मिळविला, तर नववी ब वैष्णवी जाधव हिने दुसरा क्रमांक मिळविला.शालेय अभ्यासातील प्रगतीबरोबरच ज्ञानगंगा शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही प्रोत्साहन देण्यात येते. विद्यार्थ्यांनीही या व्यासपीठांवर उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे नाव उंचावले आहे. संस्थेचे संस्थापक संचालक एस.एम. काटकर, सचिव जयेश काटकर, कार्यकारी संचालक प्रदीप खांदवे, शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका दत्ता आणि सर्व शिक्षकानी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.