ज्ञानगंगा शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा.
दि. १ मे २०२४ झील एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानगंगा इंग्लिश मिडियम शाळेत महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र दिन व कामगारदिनाचे महत्त्व सांगून शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागाने संपूर्ण कार्यक्रमाची धुरा सांभाळली.
कार्यक्रमाला लाभलेले सन्माननीय मान्यवर माजी न्यायाधीश श्री. शरदचंद्र मडगे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिकांनी *गर्जा महाराष्ट्र माझा* हे राज्यगीत आपल्या सुरेल आवाजात सादर केले.
ज्ञानगंगा डी.एड कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री. बबन जगताप सर यांनी आपल्या भाषणातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली व पुणे हे महाराष्ट्राचे भूषण व पर्यायाने महाराष्ट्र हे देशाचे भूषण आहे व आपण सर्वांनी आपल्या महाराष्ट्राबद्दल कृतज्ञता बाळगावी असे सांगितले. यानंतर अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री. एस. एम. काटकर सरांनी आपला महाराष्ट्र कशाप्रकारे प्रगती करीत आहे व आपणही प्रत्येकाने त्यासाठी जबाबदार रहावे असे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे समाजात मतदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मतदानाची शपथ दिली.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. एस. एम. काटकर सर, ज्ञानगंगा इंग्लिश मिडियम शाळेच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ डेव्हिड मॅडम, ज्ञानगंगा B.Ed कॉलेजचे प्राचार्य श्री. मिलिंद सूर्यवंशी सर , ज्ञानगंगा D.Ed कॉलेजचे प्राचार्य श्री. बबन जगताप सर , शाळेच्या पर्यवेक्षिका , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
तसेच संस्थेचे सचिव श्री. जयेश काटकर सर, संस्थेचे सल्लागार श्री. प्रदीप खांदवे सर आणि ज्ञानगंगा प्रशाला आणि ज्युनिअर काॅलेजच्या प्राचार्या सौ. अनुराधा निकम या मान्यवरांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यानंतर सामूहिक वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.
See translation